बिहार विधानसभेत दारूवरून राडा ;सत्ताधारी-विरोधक भिडले

पाटणा - विधानसभेला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. मात्र बिहारमध्ये लोकशाहीच्या या मंदिराची प्रतिष्ठा व सन्मान आमदारांनी पार धुळीस मिळवला.  बिहार विधानसभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या समोरच सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.मुझफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी विरोधी पक्ष आरजेडीने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच महसूलमंत्री रामसुरत राय यांच्या राजीनाम्याची मागणीही आरजेडीने लावून धरली होती. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. धक्काबुक्की व शिवीगाळ यांनी सभागृह दणाणून गेले. शाळेत सापडला अवैध दारूसाठा -मुझफ्फरपूरमध्ये महसूलमंत्री रामसुरत राज यांच्या भावाकडून चालवण्यात येत असलेल्या शाळेत अवैध दारू साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणावरून महसूलमंत्री रामसूरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा दारूबंदीवर बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून आरोप प्रत्यारोपांस सुरुवात झाली. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक असते तर उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नसते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला, त्यावरून सत्ताधारी पक्षांचे आमदार अधिकच संतप्त झाले.भाजप आमदार संजय सरावगी, भाजपचे मुख्य सचेतक डॉ. संजीव आणि उप सचेतक जनक सिंह व आरजेडीचे आमदार रामवृक्ष सदा यांच्यात हाणामारी झाली. आरजेडी आमदार रामवृक्ष सदा यांनी आरोप लावला की, सत्ताधारी आमदारांनी अपशब्दांच्या वापर करत जातिवाचक शिव्याही दिल्या.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget