जळगाव महापालिकेची महापौर निवडणूक ; भाजपचे तब्बल ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल'

जळगाव - महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. रविवारी दुपारनंतर महापालिकेच्या राजकीय वर्तुळात धक्कादायक घडामोडी घडल्या. महापौर व उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक घेण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे तब्बल ३० नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाले आहेत. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाऊन सामील झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपचे संकटमोचक माजीमंत्री गिरीश महाजन यांना हा जबर धक्का मानला जात आहे.महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार व्यूहरचना आखली असून, महापौरपदासाठी नगरसेविका तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित केले आहे. तसा व्हीप देखील गटनेते अनंत जोशी यांनी काढला. दुसरीकडे, उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केली असून, त्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क नेते संजय सावंत हे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने राज्यातील सत्तेचा उपयोग महापालिका ताब्यात घेण्यासाठी केल्याचे दिसून येत असून, या माध्यमातूनच भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावल्याची सूत्रांची माहिती आहे.

जळगाव महापालिकेत ५७ नगरसेवकांसह भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. सुरुवातीच्या अडीच वर्षांचा महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर १८ मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौर निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये सुरुवातीपासून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रविवारी दुपारनंतर मात्र, धक्कादायक घडामोडी घडल्या. माजीमंत्री गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी महापौर पदाच्या नावाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. परंतु, त्यापूर्वीच भाजपतील तब्बल ३० नगरसेवक हे अचानक 'नॉट रिचेबल' झाले. त्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीला अवघे ४ दिवस शिल्लक असताना या घडामोडी घडल्या. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या गटाची चिंता वाढली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget