दफनभूमीच्या राखीव भूखंडावर रुग्णालयाचा प्रस्ताव

वसई - वसई-विरार शहरातील मुस्लीम समाज दफनभूमीसाठी झगडत असताना दुसरीकडे नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे दफनभूमीसाठी राखीव असलेल्या जागेवर रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  यामुळे मुस्लीम समाज संतप्त झाला असून याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.वसई विरार शहरातील मुस्लीमांची  लोकसंख्या वाढत असून त्यांना दफनभूमीची कमतरता भेडसावत आहे. सध्या शहरात २२५ मशिदी असून लोकसंख्या अडीच लाखांच्या वर आहे. तीस वर्षांपूर्वी  लोकसंख्या २५ हजार होती तेव्हा १८ दफनभूमी होत्या. आता वाढली तरी दफनभूमीची संख्याही तेवढीच आहे. वसई विरारमधील २८ गावांना दफनभूमीच नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या या वाढत्या लोकसंख्येला आणखी १० दफनभूमींची गरज आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येत आहेत.दफनभूमीसाठी शहरात अनेक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी नालासोपाारा पूर्वेच्या आचोळे येथील भूमानपन क्रमांक ६ ही जागा एक आहे. येथील १६ एकर  जागा दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आली होती.  तत्कालीन नालासोपारा नगर परिषदेने २००२ मध्ये ठराव करून येथील ४० गुंठे जागा दफनभूमीसाठी आरक्षित केली. २००५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा नालासोपारा नगर परिषेदला दफनभूमीसाठी हस्तांतरितदेखील केली. मात्र दफनभूमीचा तयार करण्यात आली नाही. या जागेसाठी बसीन मुस्लीम कब्रस्तान कमिटीतर्फे सातत्याने आंदोलने करण्यात येत होती.  दरम्यान, आचोळेतील भूमापन क्रमांक ६ ही जागा न्यायालयासाठी देण्यात आली. मात्र न्यायालयासाठी जागा योग्य नसल्याने त्यासाठी अन्य पर्यायी जागेचा विचार करण्यात येत आहे. आता पालिकेने या जागेवर २०० खाटांचे रुग्णालय बनविण्याचा निर्णय घेतला  आहे. मुळात ही जागा आमच्यासाठी राखीव होती. आम्ही सातत्याने जागा मागत असताना ती दिली नाही आणि आता रुग्णालय बांधण्यात येत आहे. आमचा रुग्णालयाला विरोध नाही, परंतु १६ एकर जागेपैकी किमान एक एकर जागा दफनभूमीसाठी देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे बसीन तालुका मुस्लीम कब्रस्तान समितीचे अध्यक्ष खलील शेख यांनी सांगितले.दरम्यान, याबाबत नुकतीच मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यांची खासदार राजेंद्र गावित यांच्यासमेवत आयुक्तांबरोबर चर्चा झाली. यावेळी  तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

शहरातील मुस्लीम धर्मीयांचा दफनभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लढा दिला जात आहे. २०१३ मध्ये वसई विरार महापालिकेने वसई पूर्वेच्या गोखिवरे, मालोंडे, उमेळमान, दिवाणमान, नालासोपारा येथील आचोळे आणि विरारच्या नारिंगी तसेच विरार पूर्वेला अशा १० ठिकाणी दफनभूमी तयार करून देऊ, असे शासनाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. मात्र आजतागायत या ठिकाणी दफनभूमी बनविण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांना मुस्लीम समाजाची मते हवी असतात, मात्र प्रत्यक्षात आम्हाला दफनभूमी दिली नाही, अशी खंत दफनभूमीसाठी लढणाऱ्या खलील शेख यांनी व्यक्त केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget