केरळमधील काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे काँग्रेसचे केरळमधील मोठे नेते व माजी खासदार पी.सी. चाको यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात, असे म्हटले होते. चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देताना चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे मी समाधानी आणि आनंदी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.केरळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची डाव्या पक्षांसमवेत आघाडी आहे. ओमन चंडी व रमेश चन्नेथिला यांनी आपापले गट बनवून पक्षावर नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप त्यांनी पक्ष सोडताना केला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget