साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी कोकिळा बेन रुग्णालयात दाखल

मुंबई - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आता त्यांना मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रज्ञा सिंह मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात येत आहे.प्रज्ञा सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. शुक्रवारी (५ मार्च) सायंकाळी त्यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) अचानक वाढला. अनेक प्रयत्न करुनही रक्तदाब कमी झाला नाही. आज (६ मार्च) तर त्यांना श्वास घेण्यासही त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्टर्ड प्लेनने त्यांना मुंबईत आणण्यात आले. डिसेंबर २०२० मध्ये कोरोना संसर्गानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साध्वी प्रज्ञा सिंह मध्यप्रदेशातील भोपाळ येथून खासदार आहेत. त्यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यांच्या विरोधात मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget