५० लाखांच्या बनावट नोटांसह भोजपुरी अभिनेत्याला अटक

नवी दिल्ली - नोटबंदी झाल्यानंतरही देशात खोट्या नोटांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. बनावट नोटांचा धंदा आजही देशात राजरोसपणे सुरु असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना दिल्लीत उघडकीस आली. एका भोजपुरी अभिनेत्यालाच ५० लाख रुपयांच्या खोट्या नोटांसह अटक झाली. बनावट नोटांप्रकरणी कधी भारतातीलच लोकांना पकडले जात आहे, तर कधी देशाबाहेरील लोकांचाही समावेश असतो. यात शेजारी राष्ट्र पाकिस्तानसह बऱ्याच देशांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांना बनावट नोटांचे रॅकेट उघड करण्यात यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (१६ मार्च) याचा खुलासा केला. या कारवाईत दोघांना पकडण्यात आले आहे. यात एका भोजपुरी अभिनेत्याचाही समावेश आहे. त्याच्याकडून ५० लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या. दिल्ली पोलिसांना बऱ्याच वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात राजधानी दिल्लीत खोट्या नोटा सापडल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या बनावट नोटा तस्करांची नाव मो. शाहिद उर्फ राज सिंह उर्फ लल्लन (२५, बाटला हाउस, जामिया नगर, दिल्ली) आणि सैय्यद जेन हुसैन (जोगाबाई एक्सटेंशन, ओखला, जामिया नगर, दिल्ली) अशी आहेत.विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींमध्ये शाहिदचे शिक्षण केवळ पाचवी आणि सैय्यद जेन हुसैनचे शिक्षण ९ वी पास आहे. सैय्यद जेनची आधीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो आधी टॅक्सी ड्राईव्हरचे काम करत होता. मास्टरमाइंड मो. शाहिद दिल्लीत आश्रम परिसरात फिल्म स्टूडिओ चालवतो. त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे आधीपासूनच ८ गुन्हे दाखल आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget