पेट्रोल पंपावरील मोदींचे बॅनर हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या राज्यांमधील सर्व पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआयने विश्वासू सूत्रांच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे.५ राज्यांमध्ये विधानसभेच्या ८२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत मतदान होणार आहे. तर सर्व राज्यांमधील निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी मध्ये ६ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यात निवडणूक होईल. २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत हे मतदान पार पडेल. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी १४८ आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २११ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला ४४, डाव्या पक्षांना २६ आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या दिग्गजांनी बंगालमध्ये सभांचा धडाका लावला होता. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये आहे. तर अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी ममतांवर चहूबाजूने हल्ला चढवला आहे.पश्चिम बंगालमध्ये २९४ सदस्यांची विधानसभा आहे. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल २१९ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले होते. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ २३, डाव्यांना १९ आणि भाजपला १६ जागाच मिळाल्या होत्या. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget