मनसुख हिरेन मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये - संजय राऊत

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा एनआयएद्वारे तपास करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारले आहे. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचे सत्यबाहेर येणार नाही, असे सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. विरोधकांनी मुद्देसुद माहिती दिली तर त्याचा तपास व्हायलाच हवा. नक्कीच व्हावा. ही घटना दुर्देवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवे. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढे सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. राज्याचे अधिवेशन सुरू असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशायस्पदपणे मृत्यू होणे हे नक्कीच धक्कादायक आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणे योग्य नाही, असे सांगतानाच हिरेन यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश व्यथित करणारा आहे. हे नक्की काय आहे? हे बाहेर यायलाच हवे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने  खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचे त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. क्राईम ब्रँचने त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget