मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली - मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या विनंतीवरून ५० टक्क्यांच्या वर आरक्षण असणाऱ्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आजच्या सुनावणीकडे लक्षमराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ८ मार्च रोजी राज्य सरकारने हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले आहे. त्यामुळे त्या राज्यांचाही यात समावेश करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ज्या राज्यांत आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेले, त्या राज्यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला होता.पाच सदस्यीय घटनापीठाकडे आहे प्रकरणन्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले असून न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर या न्यायधीशांचा या घटनापीठामध्ये समावेश आहे.  पाच सदस्यीय घटनापीठाने ५ फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आरक्षण समर्थकांतर्फे १२ ते १७ मार्चदरम्यान युक्तिवाद होईल. तर १८ मार्च रोजी केंद्र सरकार बाजू मांडणार आहे. दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून, त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करावी, अशी विनंती राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांनी केली होती. मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेवर आणि राज्य विधिमंडळ एखाद्या विशिष्ट जातीला सामाजिक म्हणून घोषित करण्यास पुरेसे सक्षम आहे की नाही या कायदेशीर प्रश्नाची तपासणी करताना पाच न्यायाधीशांच्या घटना खंडपीठासमोर १०२व्या घटनादुरुस्तीचा अर्थ लावण्याचा मुद्दा उपस्थित झाला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget