उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब

डेहराडून - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आजच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून आजपासून त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे.महाविद्यालयीन जीवनापासूनच तीरथ सिंह रावत हे विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते. हेमवंती नंदन गढवाल विश्वविद्यालयात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते उत्तराखंडच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री झाले. तसेच राष्ट्रीय मंत्रीही राहिले. १९८३ ते १९८८ संघाचे प्रचारक होते. १९९७ मध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेवर ते निवडून गेले. विधानसपरिषद सदस्य म्हणून अनेक समित्यांवर त्यांनी काम केलं. २००७ मध्ये त्यांची उत्तराखंड भाजपच्या प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते प्रदेश निवडणूक अधिकारी होते. २०१२ मध्ये रावत चौबटाखाल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. २०१३ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. सध्या ते भाजपचे खासदार आहेत.तीरथ सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमित शाह यांनी २०१६-१७ मध्ये देशातील विविध भागात १२० दिवस यात्रा केली होती. तेव्हा तिरथ सिंह रावत हे त्यांच्यासोबत कायम होते. २०१७ मध्ये जेव्हा तिरथ सिंह यांना आमदारकीचे तिकीट मिळाले नाही तेव्हा अमित शाह यांनी त्यांना हिमाचल प्रदेशात भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीरथ सिंह यांना गढवालमधून तिकीट दिले आणि ते संसदेत पोहोचले. गढवाल लोकसभा मतदारसंघ व्हिआयपी मानला जातो. कारण याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बीसी खंडुरी निवडणूक लढवतात. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget