व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींनी दिली डरकाळी ; जखमी वाघिण जास्त घातक असते

कोलकाता - नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान जखमी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. व्हीलचेअरवर बसून त्यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला. इतकच नाही तर जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात विरोधी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पण हा हल्ला नाही तर अपघात असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. यावेळीच ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे.जमखी अवस्थेतही ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. एका व्हीलचेअरवर बसून त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या ममता जनतेला हात जोडून अभिवादन करत होत्या. पश्चिम बंगालमध्ये १४ मार्च रोजी नंदीग्राम दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मायो रोड ते हादरा मोड अशी ५ किलोमीटरची रॅली तृणमूल काँग्रेसकडून काढण्यात आली.तासाभराच्या रोड शोनंतर ममता बॅनर्जी यांनी एका सभेलाही संबोधित केले. मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. आपण व्हीलचेअरवर बसूनच राज्यभर उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. मी जीवनात अनेक हल्ल्यांच्या सामना केला आहे. मात्र मी कधी कुणासमोर आत्मसमर्पण केले नाही. मी माझी मान कधीच वाकवणार नाही. एक जखमी वाघिण अधिक घातक असते, अशा शब्दात ममता यांनी जणू डरकाळीच फोडली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget