प. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी भाजपने शनिवारी जाहीर केली. सुवेंदु अधिकारी यांना त्यांच्या नंदीग्राम या गृह मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा भाजप उमेदवारांत समावेश असून, एजेएसयू या सहयोगी पक्षासाठी एक जागा सोडण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्यात २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यांत मतदान होत असलेल्या ६० जागांपैकी ३ जागा सोडून इतर सर्व जागांवरील उमेदवारांची भाजपने घोषणा केली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget