पुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग

पुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.पुण्यातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये मटण आणि चिकनची दुकाने आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केटला भीषण आग लागली. या आगीत तब्बल २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे. दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्यादेखील आगीत जळाल्या आहेत. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget