केरळमध्ये काँग्रेसला झटका, पीसी चाको यांचा राजीनामा

केरळ - केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असताना काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू राहिलेले पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी राजीनाम्याची घोषणा केली. माहितीनुसार चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे  म्हटले.पक्षांतर्गत गटबाजीबाबत आपण पक्ष नेतृत्वाला कळवून थकलो आहोत. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरु आहे, त्याबाबत पक्ष नेतृत्व फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चाको यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.गांधी परिवार हा देशातील पहिला परिवार असल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वी चाको यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी देशपातळीवर चाको यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपने तर चाको हे गांधी परिवाराची चाटूगिरी करण्यातच धन्यता मानत असल्याचे टीकास्त्र डागले होते. आता मात्र त्यात गांधी परिवाराच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत चाको यांनी राजीनामा दिला आहे.

“मी केरळचा आहे तिथे काँग्रेस नावाचा कोणता पक्ष नाही. तिथे दोन पक्ष आहे. एक काँग्रेस (I), तर दुसरी काँग्रेस (A). या दोन पक्षांची एक ओऑर्डिनेशन कमिटी आहे, जी KPCC प्रमाणे काम करत आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोक पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याची वाट पाहत आहेत. मात्र, वरिष्ठ नेते गटबाजीत समाधान मानत आहेत. मी पक्ष नेतृत्वाकडे ही गटबाजी संपवण्याची विनंती केली आहे. पण पक्ष नेतृत्व मात्र दोन्ही गटांच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवत आहे”, अशा शब्दात पीसी चाको यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget