विधानसभा निवडणुकीआधी शशिकला यांचा राजकारणातून संन्यास

चेन्नई - तामिळनाडूत ऐन विधानसभा निवडणुकीआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. शशिकला यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी आपल्या समर्थकांना आणि AIADMK पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि DMK ला पराभूत करण्याचे आवाहन केले. 

शशिकला यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे, “तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहिल आणि जयललिता यांच्या मार्गावर चालत राहिल. तामिळनाडूसह देशातील ४ राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे या पाचही राज्यांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तामिळनाडूमध्ये तर करुणानिधी आणि जयललिता या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच राज्याची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोणता पक्ष सत्तेत येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदा या निवडणुकीत प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्याही पक्षाने एन्ट्री केली. त्यामुळे त्यांचा पक्षही किती परिणाम करतो हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेने एनडीएमध्ये एंट्री केली होती. भाजप आणि एआयडीएमके तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. तामिळनाडूतील एकूण ३९ लोकसभेच्या जागांपैकी भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय झाला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget