घरफोडी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नवी मुंबई - भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाकाने चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. महेश भिका चौधरी (५१) आणि आदित्य/दीपक रामचंद्र राणा ऊर्फ रैना (२९) अशी या दोघांची नावे असून या टोळीने दिवसाढवळ्या घरफोडीचे ४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या गुह्यातील १२ लाख ५८ हजार रुपये किमतीचे २६२ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.

या टोळीतील तिघे जण १ जानेवारी रोजी वाशीतील कोपरी गावातील या वृद्धेच्या घरी भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने गेले होते. या वृद्ध महिलेने त्यांना घरामध्ये घेतल्यानंतर त्यांनी तिला चाकूचा धाक दाखवून तिच्या तोंडाला व हाताला चिकटपट्टी लावली. त्यांनतर या चोरांनी वृद्धेच्या अंगावरील सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पळ काढला.याबाबत एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ने या प्रकरणाच्या समांतर तपासाला सुरुवात केली होती. या गुह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल कदम व त्यांच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तसेच तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळविली.त्यानंतर पोलिसांनी महेश चौधरी व आदित्य/दिपक राणा या दोघांना अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच नेरुळ, रबाळे व एपीएमसी परिसरातदेखील दिवसा घरफोडी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे २६२ ग्रॅम वजनाचे दागिने तसेच गुन्ह्यांत वापरलेले शस्त्र हस्तगत केले.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget