सचिन वाझेंची मध्यरात्री तब्येत पुन्हा बिघडली

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटातील संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने २५ मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता. मात्र, काल रात्री NIA च्या कार्यालयात सचिन वाझे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NIA च्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण केले होते. हे डॉक्टर सचिन वाझे यांच्या प्रकृतीची तपासणी करून साधारण रात्री एक वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, NIA ने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग १३ तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget