बनावट नोटा वटवणाऱ्याला अटक

नवी मुंबई - पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटा वटविण्याकरिता सीबीडी परिसरात आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा लावून अटक केली आहे. सलीम अली असरील हक (३०) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपये चलनाच्या ३७० बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या बनावट नोटा त्याने पश्चिम बंगाल येथून आणल्याची पोलिसांना शंका आहे. त्यानुसार त्याची अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.सीबीडीतील बस डेपोजवळ एक व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटवण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने सीबीडी बस डेपोजवळ सापळा लावून आरोपी सलीम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ या बनावट नोटा आढळल्या.या आरोपीने बनावट नोटा कुठून व कशाप्रकारे मिळविल्या तसेच, त्या कुठे तयार केल्या याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बिपीनकुमार यांनी दिली. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी भागांत या नोटा वटवण्याची त्याची योजना होती.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget