सिडको भूखंड विक्रीचा वाद राज्य शासनाकडे

नवी मुंबई - नऊ हजार कोटी रुपयांचा तोटा भरुन काढण्यासाठी सिडकोने महामुंबई क्षेत्रातील अनेक भूखंड विक्रीचा सपाटा लावलेला असताना नवी मुंबई पालिकेने किमान सार्वजनिक नागरी सेवा सुविद्यांचे भूखंड तरी विक्री करु नयेत अशी विनवणी सिडकोला केली आहे पण भूखंड विक्री करुनच सिडको निधी जमा करु शकते असे सांगितल्याने हा भूखंड वाद राज्य शासनाकडे गेला आहे. नगरविकास विभाग या वादावर लवकर निर्णय घेईल अशी दोन्ही प्रशासनांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.राज्याने डिसेंबर मध्ये एकात्किक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली आहे. त्या अगोदर गेल्या वर्षी पािलकेने अनेक वर्षांनंतर विकास आराखडा मंजूर करुन राज्य शासनाकडे पाठविला आहे. या विकास आराखडय़ात पालिकेने शहरातील ५४० भूखंडावर नागरी सेवा सुविद्यांसाठी आरक्षण टाकलेले आहे. नवी मुंबईला वाढीव चटई निेर्दशांक मिळाला असल्याने जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या दुप्पटा वाढणार असून त्यांना सार्वजनिक सेवा सुविधा लागणार असून पुढील वीस ते तीस वर्षांत लागणारे सार्वजनिक उपयोगाचे भूखंड सिडकोने राखीव ठेवावेत असे अनेक पत्र सिडकोला दिले आहेत मात्र सिडकोने या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या असून भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. मागील काही महिन्यात सिडकोने दिडशे पेक्षा जास्त छोटे मोटे भूखंड विक्रीला काढले असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. सानपाडा येथे दीड एकर भूखंडासाठी सिडकोला १६६ कोटी रुपयांचा देकार आला आहे. सिडकोने आपल्या क्षेत्रातील मोकळे भूखंड विकण्यास सुरुवात केली आहे. यात पालिकेने आरक्षण टाकलेल्या भूखंडांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पालिकेने सिडकोच्या या भूखंड विक्रीच्या विरोधात अनेक वेळा तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने हे प्रकरण आता नगरविकास विभागाकडे गेले आहे. भूखंड विक्री हा सिडकोचा मुळ उद्देश असून त्या शिवाय निधी जमा होणे शक्य नाही अशी भूमिका सिडकोची आहे तर सर्वच भूखंड विक्री झाले तर पुढील काळात नागरी सेवा सुविधांसाठी भूखंड कोणते मिळतील अशी भूमिका पालिकेने मांडली आहे. हा वाद आता नगरविकास विभागाकडे गेला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget