हिरेन वापरत नसलेला मास्क आला कुठून? ; कुटुंबीयांची चौकशीची मागणी

मुंबई - मनसुख हिरेन हे पायोनियर कंपनीचे मास्क वापर होते. असे असताना त्यांच्या तोंडात निळ्या रंगाचा मास्क मास्क आला कुठून? हा मास्क हिरेन यांच्या तोंडात कुणी कोंबला?, असा सवाल करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या तोंडात कोंबण्यात आलेल्या चार ते पाच मास्कवरून अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते. एटीएसने या प्रकरणी हिरेन कुटुंबीयांची चौकशी केली असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयानुसार मनसुख हे केवळ पायोनियर कंपनीचाच मास्क वापरत होते. त्या घटनेच्या रात्रीही त्यांनी याच कंपनीचा मास्क तोंडाला लावला होता. परंतु जेव्हा मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या तोंडात पाच रुमाल सापडले. त्यात एक सामान्य निळ्या रंगाचा मास्कही आढळला होता. त्याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी हिरेन कुटुंबीयांनी केली आहे. हिरेन यांची संबंधित व्यक्तीशी बाचाबाची झाली तेव्हा हा मास्क पडला का?, असा सवाल केला जात असून या निळ्या रंगाच्या मास्कच्या अनुषंगानेही एटीएस तपास करत आहे. हा मास्क कुणाचा आहे याचाही एटीएसकडून शोध घेतला जात आहे. या मास्कच्या सहाय्याने एटीएसला मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, हिरेन हत्या प्रकरणात प्रमुख संशयित असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन-दोन वेळा बदली करण्यात आली आहे. अद्यापही ते मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त अशा आरोपी सोबत दोन तास चर्चा करतात, हे अत्यंत धक्कादायक असून चौकशीत दबाव येऊ नये याकरिता त्यांना तात्काळ निलंबित करा किंवा त्यांची किमान मुंबईबाहेर बदली करा, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget