मनसुख हिरेन प्रकरण ; 'ती' मर्सिडिज कुणाची?, एनआयएचा शोध सुरु

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २२ फेब्रुवारी रोजी एक स्पॉर्पिओ आढळून आली होती. त्यात जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही तिथे आल्याचे निदर्शनास आले होते. या २ गाड्यांनंतर आता एक तिसऱ्या गाडीबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्या गाडीचा शोध आता एनआयए घेत आहे.मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यानंतर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता एका मर्सिडिज कारच्या शोधात आहे. या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची राहिली आहे.

या प्रकरणात एनआयएच्या हाती एका मर्सिडिज कारचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्ये स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता. एनआयएला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते असे दिसते. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. एनआयएच्या हाती लागलेले हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.मनसुख हिरेन त्या दिवशी कुणासोबत गेले होते. ती मर्सिडिज कुणाची होती, याचा तसाप आता एनआयए करत आहे. मर्सिडिजचा शोध लागला तर मनसुख हिरेन प्रकरणात अजून कोण-कोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी केलेल्या दाव्यानुसार मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे हे फक्त एक प्यादे आहे. यात अनेक बड्या लोकांचे हात गुंतल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ती मर्सिडीज नेमकी कुणाची? याचा शोध एनआयएला लागल्यानंतर या प्रकरणातील गूढ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget