दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली - बाटला एन्काऊंटर केस प्रकरणात आरिज खानला फासीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने ही केस रेयरेस्ट ऑफ रेयर असल्याचे म्हटले. दिल्लीच्या साकेत कोर्टाने ८ मार्च रोजी दोषी मानले होते. राजधानी दिल्लीमध्ये २००८ साली झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटर केसनंतर आरिज खान फरार झाला होता. त्याला २०१८ मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. तर पोलीस कर्मचारी बलवंत सिंह राजवीरच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात यापूर्वी आरोपी शहजाद अहमदला २०१३ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्याचे २ साथीदार आतिफ आमीन आणि मोहम्मद साजिद मारले गेले होते.इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खानला साकेत कोर्टानं दोषी ठरवले होते. १५ मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचेही कोर्टाने जाहीर केले होते. आरिज खानला कलम ३०२, ३०७ आणि आर्म्स अॅक्टनुसार दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरिज खान हा २००८ मधील दिल्ली-जयपूर-अहमदाबाद आणि यूपीतील न्यायालयात जे बॉम्बस्फोट झाले होते. त्यातील मुख्य सूत्रधारांमध्ये आरिज खानचे  नाव होते. या बॉम्बस्फोटानंतर आरिज खानची माहिती देणाऱ्यास तब्बल १५ लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. तसंच त्याच्याविरोधात इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर करण्यात आली होती. मूळचा आझमगढचा रहिवासी असलेला आरिज खान उर्फ जुनैदला स्पेशल सेलच्या टीमने फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक केली होती.१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीतील अनेक भागांमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात २६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर १३३ नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला १९ सप्टेंबर २००८ रोजी या हल्ल्याच्या कट रचणाऱ्या अतिरेक्यांसंबंधित महत्त्वाची माहिती मिळाली.इंडियन मजाहिद्दीनचे ५ अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊस येथील बिल्डिंग L-१८ च्या फ्लॅटमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पाच अतिरेक्यांमध्ये आरिज खान, आतिफ अमीन, मोहम्मद साजिद, मोहम्मद सैफ आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. १३ सप्टेंबर २००८ रोजी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा जेव्हा आपली टीमला घेऊन बाटला हाऊसला पोहोचले तेव्हा पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मोहन चंद शर्मा शहीद झाले. मोहन चंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने याआधी शहजाद अहमदला दोषी घोषित करण्यात आले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget