रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिल्याचे एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप

मुंबई - सुशांत सिंह राजपूत केसचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्यूरोने पहिली चार्जशीट दाखल केली आहे. ज्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या नावाचाही समावेश आहे. NCB च्या चार्जशीटमध्ये ३२ व्यक्तींच्या विरोधात अवैध तस्करीचा आरोप लावण्यात आला आहे. एनडीपीएस अधिनियमानच्या कलम २७ अ प्रमाणे आरोप लावण्यात आला आहे. ज्यात आरोपींना १० आणि जास्तीत जास्त २० वर्षांच्या कैदीची तरतूद आहे. रियाने यापूर्वीच स्वतःच घरात ड्रग्स आणत असल्याचे मान्य केले आहे. नोव्हेंबर २०१९ पासून याची सुरुवात झाली होती. एवढेच नाही तर ड्रग्ससाठी रियानं भाऊ शौविकलाही आधीच पैसे ट्रान्सफर केले होते. ज्यामुळे आता NCB ने रियावर ड्रग्स खरेदी करण्याचे आणि ते सुशांतला पुरवण्याचे आरोप लावले आहेत.सुशांतला मारिजुआना आणि गांजा दिला जात असे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषीकेश पवार नावाचा अन्य एक आरोप ड्रग्स खरेदी करून सुशांतला पुरवत होता. असे या चार्जशीटमध्ये नमुद करण्यात आले आहे. यातील काही आरोपी हे जमिनावर बाहेर आले आहेत. तसेच या केसचा अधिक तपास अद्याप सुरू आहे.NCB ने ११,७०० पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली. यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. NCB ने न्यायालयात जी चार्जशीट दाखल केली आहे त्यानुसार रियाला १० किंवा २० वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जूनला त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी मृत आढळून आला होता.सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज केसमध्ये रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.  त्यानंतर ती जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिची जामीन याचिका मंजूर केली. रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली होती. शौविकला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने जामीन दिली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget