जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रवासी महिलांसोबत संवाद....

मुंबई - “लाख को पचास” (लाखाला ५०) या अभियानाचा भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त परिसर संस्थेमार्फत मुंबईतील विविध क्षेत्रातील महिलांचा सार्वजनिक वाहतूकीवर अनुभव ऐकण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. हे अभियान सर्व शहरांमध्ये एक चांगली बस वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी राज्य व केंद्र शासनाने एक सर्वसमावेशक कार्यक्रम सुरू करावा या मागणीसाठी देशव्यापी मोहिमेचा एक भाग आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने ठरवलेल्या मानकांनुसार प्रति लाख रहिवाशांमागे किमान ५० बसेस ची गरज आहे, हे या मोहिमेद्वारे ठळकपणे दर्शवली जात आहे.२७ महानगरपालिका मध्ये सार्वजनिक वाहतुक ही अनिवार्य सेवा बनवण्याचे धोरण जाहीर करणे, अशी याचिका माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे . पाच कोटी पेक्षा जास्त शहरी लोकसंख्या असलेले महाराष्ट्र हे भारतातील सर्वात शहरी कृत असलेल्या राज्यांपैकी एक आहे. बऱ्याच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक अतिशय वाईट व नसल्यासारखी आहे, ज्याचा परिणाम म्हणून खाजगी वाहनांमध्ये आणि परिणामतः गर्दी व प्रदूषणात स्फोटक वाढ झाली आहे.परिसर व सम नेट (SUM Net)  यांचे सदस्य व अन्य सहकारी मिळून महाराष्ट्रातील ६ शहरांमध्ये अभियानाबाबत संवाद आयोजित करीत आहेत शहरात बस सेवेची गरज आणि बस सेवा नसताना होणाऱ्या दुष्परिणामांबाबत विविध भागधारक चर्चा करण्याच्या आणि आपले बस सेवेशी निगडित अनुभव व मत मांडण्याच्या उद्देशाने हि संवादमाला आयोजित केलेली आहे.याच अनुषंगाने दिनांक ८ मार्च २०२१ सोमवारी मुंबईत विविध क्षेत्रातील महिला सोबत  (व्हर्च्युअल/आभासी) मार्फत संवाद झाला आणि तो थेट परिसर च्या फेसबुक पेज वर प्रसारित करण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्रासाठी सार्वजनिक बस सेवा प्रदाता बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेद्वारे संपूर्ण मुंबई मध्ये या भागात १ लाख लोकसंख्येकरिता सुमारे २७ बसेस सेवा देतात या संवादात शहरातील विविध भागधारक- सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, सहकार क्षेत्र, पॉलिटिकल अॅनलायझर, विद्यार्थी महिला प्रवासी सहभागी होते. कार्यकमाची प्रस्तावना परिसर संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर रंजित गाडगील यांनी सादर केली त्यानंतर वेबिनार मधिल पॅलन सदस्यांसोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या विषयावर चर्चेला सुरुवात झाली या चर्चेत

१) श्रुती शिरसागर ( अध्यक्ष साद फाऊंडेशन आणि नगर राज बिल समर्थन मंच)

२) प्रतिक्षा कांबळे ( सदस्य :- विश्र्वशांती सामाजिक संस्था, 

३) धनश्री नाईक ( व्यवस्थापक, संकल्प पतसंस्था)

४) ज्योत्स्ना वाघमारे ज्येष्ठ विशेष शिक्षणतज्ज्ञ 

मुख्याध्यापिका, दक्षिण्य शाळा संचालक, संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई

 ५) पुनम खडताळे  :-कार्यालयाचे नाव :- श्री मीडिया पॉलिटिकल रिसर्च ब्युरो, मुंबईपद :- पॉलिटिकल अॅनलायझर

६) प्राजक्ता बाबर :- (समाजकार्य पदवी विद्यार्थी)

७) अनम शेख ( विद्यार्थी) इत्यादी महिला प्रवासी ने अपले अनुभव सांगुन बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली

श्रुती शिरसागर यांनी आपले मत मांडताना सांगितले की महिला आणि सार्वजनिक बस वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे विकास काम मोठ्या प्रमाणात चालू पण हे शहर नियोजन करताना महिलांच्या व बालकांचा दृष्टिकोनातून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन सार्वजनिक वाहतूक सुविधांची अंमलबजावणी केली पाहिजे तसेच बस चालक, कंडक्टर, यांना जेंडर सेंसितिझेशन चे ट्रेनिंग दिले पाहिजे बस मॅप, स्टॉप ची माहिती, हेल्पलाईन नंबर ही माहिती प्रत्येक स्टॉप वर बसमध्ये लावले पाहिजे.बस स्टॉप च्या आजूबाजूला फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट असले पाहिजे.सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे. हे मत व्यक्त केले त्यानंतर पुनम खडताळे यांनी सांगितले बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी ज्याप्रकारे रेल्वेची वेळ, ती कोणत्या ठिकाणी आहे ही सर्व गोष्ट एम इंडिकेटर च्या मार्फत कळते तसेच योग्य पर्याय बेस्ट बसेस साठी देखील देण्यात यावा, यामुळे बेस्ट बस कोणत्या ठिकाणी आहे व किती वेळात आपल्याला हव्या असलेल्या बस स्थानकावर ती येईल हे कळल्यास स्त्रियांना त्याचा खूप जास्त उपयोग होईल.. फक्त स्त्रियांनाच नाही तर सर्व समाज वर्गाला त्याचा खूप जास्त उपयोग होईल..बेस्ट प्रशासनानेही स्त्री वर्गामध्ये स्वतःचा विश्वास निर्माण करावा की बस मधून प्रवास करताना त्यांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि त्यांचा हा प्रवास अगदी उत्तम रित्या सुखकर आणि सुरक्षित होईल.. या दृष्टिकोनातून बेस्ट प्रशासनाने पावले उचलावीत असे सांगितले. तसेच ज्योत्सना वाघमारे यांनी दिव्यांग महिला व विद्यार्थ्यांचा समस्यांवर आपले अनुभव वास्तव समाजासमोर मांडले 

प्रतिक्षा कांबळे यांनी बस प्रवास दरम्यान मोठ्या प्रमाणात महिलांना पुरुषांच्या वाईट नजरा आणि वाईट स्पर्श शारिरीक छळाला सामोर जावं लागतं आहे या भिती पोटी अनेक महिला बस प्रवास करत नाही तसेच बसेची संख्या कमी असल्याने किंवा गर्दिला पाहता व बस उशिरा येण्यामुळे अनेक वेळा इच्छा नसतानादेखील खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात हे आजच्या महागाईमध्ये परवडणारे नाही या सर्व कष्टकरी प्रवासी महिलांच्या बोलण्याचा सुर एकच  दिसत होति बसच्या संख्येचे प्रमाण वाढले पाहिजे त्यातून अनेक समस्यांचे निवारण होईल. अशा पध्दतीने संवादाच्या माध्यमातून शहरी प्रवासी महिलांसोबत सखोल चर्चा झाली अशी माहिती परिसर संस्थेचे मुंबई सिटी समन्वयक दिपक सोनावणे यांनी दिली

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget