चक्रवर्ती आज आले ते उद्या निघूनही जातील - दिग्विजय सिंह

इंदूर - पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजपाप्रवेशावर टीका केली. अशाप्रकारे चित्रपटातील कलाकार राजकीय पक्षात ये-जा करत असतात, त्यामुळे काहीच फरक पडत नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह एका खासगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी इंदूरमध्ये आले होते.पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता युवा मतदारांना आकर्षीत करण्यासाठी चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना पक्षात समाविष्ट केले आहे. काँग्रेस डाव्या आघाडीसह पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवित आहे. आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यापूर्वी अनेक चित्रपट क्षेत्रातील लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यामळे काहीच फरक पडलेला नाही. चक्रवर्ती आज आले आहेत, ते उद्या निघूनही जातील, असे ते म्हणाले. तसेच भाजपा सरकार चालवत नाही. ते सरकारच्या नावाखाली व्यवसाय करतात. अधिकारी-कर्मचारी ते भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत प्रत्येकजण कमिशन ठरवतो. ही त्यांची कार्यशैली आहे, असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर भव्य रॅली झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात सामिल झाले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget