मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी

मुंबई - मराठा आरक्षणावर आज म्हणजेच ८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. गेल्या वेळी ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता आज या महत्त्वाच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्यात ही सुनावणी होत आहे. ८ मार्च १० ते मार्च दरम्यान विरोधक आपली बाजू मांडतील तर १२ ते १७ मार्च दरम्यान राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडेल, अशी माहिती आहे.कोव्हिड संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडत आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी मागणी मराठा संघटना करत आहे. असे असले तरी ८ मार्चची सुनावणी मात्र ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.विरोधक प्रत्येकवेळी मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, असा आरोप करतायत. अशा वेळी मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कितपत तयारी झाली, हा यानिमित्ताने प्रश्न आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget