आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचा स्थानिक निवडणुकांमध्ये एकहाती विजय

हैदराबाद - आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. ७५ नगरपालिका आणि ११ नगर परिषदांमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने विरोधी पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीचा पराभव केला. वायएसआर काँग्रेसच्या या विजयाचा स्थानिक नागरिक ‘जनश वाश’ असा उल्लेख करत आहेत.तेलगु देसम पार्टी फक्त ५ जागांवर दोन आकडी संख्या गाठू शकली आहे. तर भाजप आणि जेएसपीला अगदी थोडा फायदा झाल्याचे दिसते. काँग्रेस तर या निवडणूक निकालात दूरदूरपर्यंत दिसून येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयानंतर जनग मोहन रेड्डी यांनी ट्वीट केले आहे. ‘हा मोठा विजय जनतेला समर्पित आहे. सर्व भगिनी, भाऊ, दोस्त, आजी, आजोबांच्या आर्शीवाद आणि प्रार्थनेमुळे हा विजय मिळू शकला. या विजयामुळे तुमचा विश्वास आणि माझी जबाबदारी वाढवली आहे. जिंकलेल्या सर्व बंधू-भगिनींना माझ्या शुभेच्छा’, अशा शब्दात जगन मोहन रेड्डी यांनी जनतेचे आभार मानले आहेत.तेलगु देसम पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक ट्वीट करुन पक्ष कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘निवडणूक निकालामुळे हताश होण्याची गरज नाही. आम्ही धमक्या, सत्तेचा दुरुपयोग आणि प्रलोभनानंतरही चांगली लढाई केली आहे’, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले. दुसरीकडे आंध्र प्रदेश नगर पंचायत निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ने खाते उघडले आहे. हिंदुपूर वार्डात AIMIMच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget