एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरं विकता येतील - जितेंद्र आव्हाड

मुंबई - एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरे विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला ५ ते १० वर्ष लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख आहेत. बिल्डिंग बांधल्यानंतर पाच वर्षात घर विकता येत नाही. त्याऐवजी त्यांची झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करतोय, समिती त्याबाबत चर्चा करून लवकर निर्णय घेईल.झोपडपट्टी तोडल्यापासून एसआरएचे घर मिळेपर्यंत ते घर विकण्याचा कालावधी पाच वर्षांचा करावा, असा आमचा प्रयत्न आहे. मंत्र्यांची उपसमिती यावर निर्णय घेईल.मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. बुधवार पार्क इथे ३२ एकर झोपडपट्टी आहे.१६ एकरमध्ये ३०० चौरस फूटाचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले. इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल. अशा ठिकाणी SRA आणि म्हाडा एकत्र घर बांधू, असेही त्यांनी नमूद केले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला या महिन्यात सुरुवात होणार आहे. वरळीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळ उभी राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget