पुद्दुचेरीत काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढणार

पुद्दुचेरी - पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढवणार आहे. अन्ना आर्युलायममधील डीएमके मुख्यालयात आज द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम के स्टालिन, प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ए व्ही सुब्रमण्यन आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांनी युतीच्या करारावर सह्या केल्या. काँग्रेस १५ तर १३ जागांवर डीएमके आपल्या उमेदवारांनी उतरवले. कोणत्या पक्षाचा उमेदवार कोठून निवडणूक लढवणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नारायणसामी सरकार कोसळल्यानंतर नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू आहे. विधानसभेत २२ फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळले. पुद्दुचेरी हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. ३० निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून ३३ आमदारांची विधानसभा आहे. भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले.पुद्दुचेरीतील संख्याबळ -पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात ६ एप्रिलला होणार आहे. ३० जागांसाठी आमदार निवडले जातील. २ मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने ३ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा हा १६ आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget