धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा - प्रवीण दरेकर

मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्तच आहे. महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी २० दिवसानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतला. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंकजा यांची मागणी रास्तच आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको, असे सांगत मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget