‘गंगूबाई’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव

मुंबई - प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला संजय लीला भन्साळी निर्मित आणि अभिनेत्री आलिया भट अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट पुन्हा वादात सापडला आहे.आता कामाठीपुऱ्यातील रहिवाशांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात असलेला कामाठीपुऱ्याचा उल्लेख वगळावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कामाठीपुऱ्यात राहत असल्याने सार्वजनिक जीवनात आधीच अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यात या चित्रपटामुळे आमच्या अडचणी आणखी वाढू नयेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कामाठीपुरा रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची ५ मार्च रोजी भेट घेतली. त्यामुळे मनसे आता या प्रकरणात मध्यस्थी करणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे यांच्याशी लवकरच संवाद साधून रहिवाशांची बाजू मांडणार असल्याचे, मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ‘कामाठीपुरा’ हा उल्लेख संपूर्ण चित्रपटातून वगळावा, अशी मागणी मनसे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे करणार आहे. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या सर्वांवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचा पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे.‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा होता. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय एका वाईट कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, या मानसिक त्रासामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना गंभीर दुखापत झाल्याचा खुलासाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री आलिया भट्ट प्रथमच पडद्यावर पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यापूर्वी तिने असे पात्र कधीच साकारलेले नाही. टीझरपूर्वी चित्रपटाचे एक पोस्टरदेखील प्रसिद्ध करण्यात आले होते. पोस्टरमध्ये आपल्याला आलिया भट्ट खुर्चीवर बसलेली दिसली होती. त्यात आलिया भट्टचा अतिशय साधा लूक दिसला होता. पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ३० जुलै २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget