ओलीस ठेवलेल्या जवानाची नक्षलवाद्यांकडून सुटका

रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीमध्ये २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवले होते.नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या जवानाची सुटका केली आहे. राकेश्वर सिंह मन्हास असे त्या जवानाचे नाव आहे.राकेश्वर सिंह मन्हासच्या सुटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. पत्नी मीनू मन्हास यांनी केंद्र, छत्तीसगढ सरकार आणि लष्काराचे आभार मानले. आज माझ्या जिवनातील सर्वांत आनंदाचा दिवस आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच राकेश्वर यांच्या आईनेही आपण आनंदी असल्याचे सांगितले. राकेश्वर सिंह मनहास हे कोब्रा बटालियनमध्ये होते. राकेश्वर सिंह मनहास यांना एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या दहा वर्षांपासून राकेश्वर सुरक्षा दलात आहेत. सुरक्षा दलाच्या १ हजार ५००जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ४०० नक्षलवादी एकत्र आले होते. यावेळी सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या चकमकीमध्ये २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. तर या चकमकीत २५ हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली होती. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget