कोरोनामुळे तेजस एक्स्प्रेस पुन्हा बंद

मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई वाढत्या कोरोनाचा रुग्णामुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत तेजस एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्‍या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्यात मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. पण अनलॉकची सुरुवात होताच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस १७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पुन्हा एकदा ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.खासगी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसला सुरुवातीला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत होता. कारण या गाडी अत्याधुनिक सुविधांसह प्रवाशांची वेळेची बचत होती. मात्र कोरोनामुळे या खासगी तेजस एक्स्प्रेसचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कोरोना काळात प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा ही गाडी बंद करण्याची नामुष्की आयआरसीटीसीवर आली आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात खासगी तेजस एक्सप्रेसला नुकसान होत आहे. आतापर्यंत या खाजगी ट्रेनला ५०० कोटी रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget