राज्यात आज रात्री ८ पासून लॉकडाऊन


मुंबई -
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. बुधवारी १४ एप्रिलपासून रात्री ८ पासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. १४४ कायदा लागू करत संचारबंदी करण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद न करता अत्यावश्यक सेवांसाठी सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी बाहेर फिरु नये, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. कोरोना रोखण्यासाठी रोज सव्वा २ लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य 

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget