‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यन एक्झिट


मुंबई - निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने २०१९ मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना २’चा भाग असणार नाही. एका व्यापार स्त्रोताने कार्तिकच्या या चित्रपटातून एक्झिटविषयी वक्तव्य केले आहे. इतकेच नाही, तर धर्मा प्रॉडक्शन कार्तिक आर्यनबरोबर भविष्यात कधीच काम करणार नसल्याचे म्हटले आहे. यामागचे कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला कलह असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्तिकमध्ये क्रिएटिव्ह मतभेद देखील झाले आहेत. मात्र, कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सुरुवातीला कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. यापूर्वीही असे म्हटले जात होते की, कार्तिकने या चित्रपटाचे शूटिंग कित्येक महिने पुढे ढकलले होते. तर, हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.वृत्तानुसार, बर्‍याच दिवसांपासून कार्तिक कोरोना व्हायरसच्या साथीमुळे शूटिंग पुढे ढकलण्याविषयी बोलत होता. त्याला सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची इच्छा होती, यामुळे करण जोहरने देखील त्याला शूटबद्दल विचारले नाही. पण, जेव्हा त्याने ‘धमाका’चे चित्रीकरण पूर्ण केले, तेव्हा करण जोहर त्याच्यावर संतापला. त्यांनी अनेक बैठका घेतल्या ज्यात करण जोहरनेही आपला संताप व्यक्त केला. ज्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यात वादावादी झाली. शशांक खेतानचा ‘वॉरियर’ हा चित्रपट शाहिद कपूरला देण्यात आल्यानंतर देखील कार्तिक धर्मा प्रॉडक्शनवर चिडला होता. शाहिदने हा चित्रपट नाकारला असला, तरी ही भूमिका कार्तिककडे गेली नाही 

कार्तिक आर्यनकडे जेव्हा दोस्ताना २च्या शूटिंगसाठी तारखा नव्हत्या, त्यामुळे करणने विकी कौशलसोबत ‘मिस्टर लेले;चे शूटिंग सुरू केले आहे. कार्तिकला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रॉडक्शन हाऊसला सांगितले की, आपल्याकडे ‘दोस्ताना २’ साठी केवळ एप्रिलपासूनच्या तारखा आहेत. करणला जेव्हा कार्तिकच्या या गोष्टींबद्दल कळले तेव्हा त्याने कार्तिकला या चित्रपटातून रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार करण आणि कार्तिक दोघांचेही संभाषण पूर्णपणे बंद झाले आहे.करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष्य, कार्तिक आर्यनसोबत झळकणार होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कार्तिक आर्यनच्या जागी करण जोहर या चित्रपटात कोणता अभिनेता घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget