निर्बंध तोडल्यास गुन्हे दाखल होणार

नवी मुंबई - शासनाच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी दोन दिवस टाळेबंदी असणार असून त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाबरोबर पोलिसांची असणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नियोजन केले असून अडीच हजार पोलीस प्रत्यक्ष बंदोबस्तात असणार आहेत. नागरिकांना त्रास होऊ  न देता बंदोबस्त पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र निर्बंध तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.नवी मुंबईतून मोठी वाहतूक ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावर होते. त्यात आठवडाअखेर असल्याने बाहेरच्या गावी जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये खारघर आणि कळंबोली व जुन्या पुणे नाक्यावर नाकाबंदी करीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात बाहेरगावी जाणाऱ्यांवर निर्बंध नसणार आहेत, मात्र सहल वा सुट्टी साजरी करण्यासाठी जाणाऱ्यांना परत पाठविले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत किमान चार ठिकाणी व शीव- पनवेल महामार्गावर सहा ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याशिवाय १५ गस्त पोलीस पथके असणार आहेत.रिमंडळ एकमध्येही पामबीच, छ. शिवाजी महाराज चौक वाशी, ठाणे-बेलापूर महामार्ग, ऐरोली मुलुंड रस्ता या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी हुल्लडबाजी होऊ  शकते, जमाव होऊ  शकतो अशाही ठिकाणी पोलीस गस्त असणार आहे.टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी सह आयुक्त सर्व उपायुक्त, साहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बंदोबस्ताबाबत आयुक्तांनी सूचना देताना नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये, अशा विशेष सूचनाही दिल्या आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget