डॉ. मुरुडकर यांना पोलीस कोठडी

ठाणे - व्हेंटिलेटर खरेदी कंत्राट देण्यासाठी इच्छुक ठेकेदार कंपनीकडून लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ठाणे न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुरुडकर यांच्या आवाजाच्या नमुन्याचे परीक्षण करण्यासाठी तसेच इतर चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस कोठडीची मागणी केली होती.करोनाच्या कालावधीत महापालिकेच्या मुख्य डॉक्टरकडूनच भ्रष्टाचार झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ठाणे महापालिकेने डॉ. राजू मुरुडकर यांच्या वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार संपुष्टात आणून या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. वैजयंती देवगेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा काढली होती. नवी मुंबई भागातील इमिनोशॉप इंडिया प्राव्हेट लिमिटेड ही कंपनी या निविदेसाठी प्रयत्नशील होती. या कंपनीला निविदा मंजूर करून देण्यासाठी डॉ. मुरुडकर यांनी कंपनीकडून निविदेतील रकमेच्या १० टक्के म्हणजेच १५ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पाच लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी डॉ. मुरुडकर यांनी ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात बोलविल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी ऐरोली परिसरात सापळा रचून डॉ. मुरुडकर यांना पाच लाख स्वीकारताना पकडले.त्यांच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. मुरुडकर यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले. त्या वेळी मुरुडकर यांच्याविरोधात पुढील कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे न्यायालयाकडे त्यांच्या आवाजाचे परीक्षण करण्यासाठी तसेच इतर चौकशीसाठी पोलीस कोठडी मागितली. त्यांना ११ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget