लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास कारवाई होण्याची शक्यता

मुंबई - राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास प्रवाशांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासाबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. तुर्तास राज्य सरकाराने सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. राज्यातील लोकल, लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही. तसेच प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य केले आहे. प्रवासी कोरोना नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी प्रवाशांना ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहेत. हा नियम अंतर्गत रेल्वे गाड्यांसाठी सुद्धा लागू करण्यात आला आहे. यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्यावर कसलाही नियम लागू नव्हता. फक्त देशांतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी केली जायची. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सरसकट सर्व रेल्वे गाड्यांवर हे नियम लावलेले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी कार्यालयांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इतर क्षेत्रातील प्रवाशांनी लोकल प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न आता पडला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला राज्य सरकाराकडून रात्री उशिरापर्यंत नियमावलीची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget