पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार

मुंबई - बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत हिचे आयुष्य आता लोकांसाठी एक कोडे बनले आहे. कधीकधी ती म्हणते की, तिचे लग्न झाले नाही, तर कधी ती लग्न झाले असल्याचेही सांगते. लोक अजूनही तिच्या लग्नाबद्दल संभ्रमित आहेत. अशा परिस्थितीत राखी सावंत हिने आता एक नवीन विधान केले आहे. राखीने पुन्हा पुन्हा एकदा लग्न करण्याची घोषणा केली आहे. तुम्हीही विचार करत असाल की, ती यावेळी कोणाशी लग्न करणार आहे?

बिग बॉस १४मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते. आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. बिग बॉस १४च्या घरात राखी अभिनव शुक्लासोबतलग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.या आधी राखी सावंतने बिग बॉस १४ मध्ये म्हटले होते की, तिने पती रितेशबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत. परंतु, आता राखीने नेहमीप्रमाणे तिचा शब्द फिरवला आहे. आता राखीने ईटाइम्सशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. राखी म्हणाली की, ती सध्या रितेशच्या संपर्कात आहे आणि ते दोघे व्हिडीओ कॉलवरही बोलतात. अभिनेत्री पुढे म्हणाली की, रितेशने आता आमच्या लग्नाबद्दल सर्वांसमोर बोलण्याचे मान्य केले आहे आपल्या नात्याविषयी बोलताना राखी सावंत पुढे म्हणाली की, ‘मी रितेशला पुन्हा एकदा लग्न करण्यास सांगितले आहे. व्हिसाच्या संदर्भात रितेशला सध्या कायदेशीर अडचणी येत आहेत. लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तो भारतात येताच पुन्हा माझ्याशी लग्न करेल.यावेळी राखीनेही हे लग्न माध्यमांसमोर करणार असल्याचे सांगितले आहे.यासह आगामी प्रोजेक्टबद्दल सांगताना राखी सावंत म्हणाली की, तिला नुकताच एक मोठा रिअॅलिटी शो देण्यात आला आहे. मात्र, राखीने अद्याप या शोबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. राखी म्हणाली की, ती सध्या निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. राखी पुढे म्हणाली की, रितेश एक मोठा बिझनेसमन आहे आणि लवकरच तो या जगासमोर माझ्याशी पुन्हा लग्न करेल.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget