राज्यात कडक निर्बंध लागू, प्रशासनाला सहकार्य करण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन

मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, अनेक उपायोजना करून देखील कोरोनावर नियंत्रण मिळत नसल्याने, अखेर मुख्यमंत्र्यांनी अधिक कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री ८ वाजेपासून नव्या निर्बंधांना सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध असणार आहेत.दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान या १५ दिवसांच्या काळात नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे यासाठी १३ हजार २८० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या २२ कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. याचबरोबर पोलीस हे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय साधून नियमांची अंमलबजावणी करणार आहेत. या अगोदर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहतुकीसाठी विशेष पासची तरतूद करण्यात आली होती. मात्र यावेळेला अशा प्रकारच्या कुठल्याही पासची गरज नसल्याचे पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील ३६७२८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यापैकी ३१६० पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ३७३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या पोलिसांना कोरोनाची लस देण्यात येत असून, ८२ टक्के पोलिसांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३९ टक्के पोलिसांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget