आसाम विधानसभा निवडणुक ; तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात ४०जागांवर आज मतदान

गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात आज मतदान होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे ४७ आणि ३९ जागांवर मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातील उर्वरित ४० जागांसाठी मतदान होणार आहे.  त्यापैकी २ जागा अनुसूचित जातीसाठी आणि ६ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तिसर्‍या टप्प्यात एकूण ३३७ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या टप्प्यात ७९,१९,६४१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यात ४० लाखाहून अधिक पुरुष आणि ३९ लाख महिला मतदार आहेत. यावेळी १३९ तृतीय लिंग मतदारही मतदान करतील. या ४० विधानसभा मतदारसंघात एकूण ११,४०१ मतदान केंद्रे उभारली गेली आहेत.राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि काँग्रेस प्रणीत महाज्योत या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेस २४, असम जातीय परिषद २२, भाजपा २०, जेडीयू १९, एजीपी १३, एआययूडीएफ १२, आरपीआय (ए) ११, व्होटर्स पार्टी इंटरनेशनल ११, तृणमूल काँग्रेसने १० जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. याखेरीज अन्य २० राजकीय पक्षांनीही वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या टप्प्यात २५ महिला उमेदवारही रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपा २, काँग्रेस ३, एजेपी २, एआययूडीएफ १, एजीपी १ आणि अन्य पक्षांनी ९ महिलांना रिंगणात उतरवले आहे. अपक्षाकडून ७ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपासमोर सत्ता राखण्याचे आव्हान -काँग्रेस राज्यात कमी पडली असली तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याच चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपाच्या पुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने जोरदार प्रचार केला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget