टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जींना प्रचार करण्यास २४ तासांची बंदी!

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे. आयोगाने ममता बॅनर्जी यांना २४ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठविली. भाजपाच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.विद्यापीठांसाठी कन्याश्री शिष्यवृत्ती आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शिक्षाश्री आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती आहे. अल्पसंख्यक समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, एक्यश्री आहे. मी २ कोटी ३५ लाख जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. भाजपाकडून पैसे घेतलेल्या पक्षांना मतदान करू नका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे ममता बॅनर्जी सभेत म्हणाल्या होत्या.ममता बॅनर्जी एक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२३ (३) आणि ३ अ आणि आयपीसी १८६० च्या कलम १६६, १८९ आणि ५०५ चे उल्लंघन केले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आणि निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशी अत्यंत भडक विधाने ममता बॅनर्जी यांनी केली आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.ममता बॅनर्जी यांचे उत्तर समाधानी नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर सहाव्या टप्प्यासाठी २२ एप्रिल, सातव्या टप्प्यासाठी २६ एप्रिल आणि आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल. २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget