काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार ; महापौरांनी दिले संकेत

मुंबई -  काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे विधान केले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल उघडी राहणार असून, यावरती लक्ष राहणार आहे. धार्मिक स्थळ पूर्णतः बंद होतील, असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईत सध्या बाधित रुग्ण ५३९४ आहेत. आपण आजही डेन्जर झोनमध्ये आहोत. पहिल्यांदा झोपडपट्टी भागातून कोरोना वाढत होता, आता उच्चभ्रू वस्तीतून कोरोना वाढत खाली येत आहे. गर्दीत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क तोंडाच्या खाली ठेवत असल्यानेच बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. वयोवृद्ध आणि लहान मुलं जास्त करून धार्मिक स्थळी जात असल्याचा ट्रेंड दिसतो. लोकलनेही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करू शकतील. मॉल, थिएटर आता बंद होतील, असे संकेतही किशोरी पेडणेकर यांनी दिले. १६ हजार ५६१ बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. १२९२८ बेड आता रुग्णांनी व्यापलेले आहेत. ३९३३ एवढे बेड आता उपलब्ध आहेत. आयसीयू बेडची संख्या १६२७ होती. १३०३ बेड सध्या वापरात आहेत, असंही किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केले.सध्या मुंबईत ३९३३ बेड शिल्लक आहेत. बेडचा एकूण आकडा २५००० जाणार आहे. त्वरित कोरोना सेंटर उभारले जाणार आहेत. राज्य सरकारकडून लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. खासगी ऑफिसमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल, वर्क फॉर्म होम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. सिनेमागृह, धार्मिक स्थळांवर जाण्यास निर्बंध लादले जातील. रेल्वे प्रवासावरही निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे, फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या नागरिकांना मुभा देण्याचा विचार सुरू आहे. मुंबईतील दुकाने ही एक दिवसाआड सुरू करण्याचा विचार असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget