प्रसिद्ध अभिनेते विवेक यांचे निधन, तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा

चेन्नई - तामिळ अभिनेते विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १६ एप्रिलला विवेक यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये त्यांना डाक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. १५ एप्रिलला विवेक यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली होती. यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली. सरकारी रुग्णालयात लस घेण्यामागचे कारण त्यांनी सांगितले होते. ” कोव्हिड लस सुरक्षित आहे. पण आपण लस घेतली आहे म्हणजे आपण आजारी नाही होणार असे समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.” असे मीडियाशई बोलताना ते म्हणाले होते.विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शोक व्यक्त केला. 


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget