दहशतवादी संघटनेच्या कमांडरला अटक

श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलिसांनी एका दहशतवादी हल्ल्याला आळा घातला आहे. पोलिसांनी जम्मूमधून इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेच्या कमांडरला रविवारी अटक केली. जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी ही माहिती दिली.

मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक उमैर उर्फ अब्दुल्ला असे या दहशतवाद्याचे नाव आहे. पोलिसांच्या एका विशेष पथकाने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या झज्जर कोटलीमधून त्याला अटक करण्यात आली. तो मूळचा कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा गावातील रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.१३ लाख रुपये आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली.त्याला अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत असे समोर आले, की काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्याला पैसे मिळाले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मात्र मोठा हल्ला टळला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget