मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही आणि अर्थव्यवस्था बिकट स्थितीत - सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली - मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही बिकट अवस्थेत असल्याचे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. मोदी सरकारने देशातील लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सीमेबाबत गंभीर तडजोडी केल्या आहेत, असा ठपकाही सुब्रमण्यम स्वामी यांनी ठेवला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वृत्तसंस्था, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत अनेक तडजोडी झाल्या आहेत. सध्याच्या घडीला प्रसारमाध्ममे आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जगात भारताचा बराच खालचा क्रमांक लागतो. देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीनेही उच्चांक गाठल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.तसेच पैशाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर वाढत आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर भारत दुबळा पडत आहे. मोदी सरकारने या सगळ्याबाबत तडजोड केली आहे. यापैकी अनेक गोष्टी काँग्रेसच्या राजवटीचा परिपाक असला तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी फार कमी प्रयत्न झाल्याची टिप्पणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्विटवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला इतका त्रास होतो किंवा सरकार नीट काम करत नाही, असे वाटते तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल एका युजरने विचारला. तर आणखी एका युजरने सुब्रमण्यम स्वामी यांची फिरकी घेताना त्यांच्याकडे अर्थखाते द्या, अशी मिश्किल टिप्पणी केली. तर एकाने स्वामीजी तुमची मार्गदर्शक मंडळात जाण्याची वेळ जवळ आली आहे, असे म्हटले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget