अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी ; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआय तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून संताप व्यक्त केला जात आहे. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते.इतकेच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझे नाव पोलीस डायरीत येऊ दिले नाही. सरन्यायाधीशांनी म्हटले, यांचे नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणला. अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, असे जयश्री पाटील निकालानंतर म्हणाल्या होत्या.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget