... तर मुंबईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल - अस्लम शेख

मुंबई - राज्यात कोरोना पुन्हा फैलावत आहे रोज दहा दहा हजारावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तरीही रस्त्यावरची आणि बाजारातील गर्दी कमी झालेली नाही. मुंबईकर कोरोना नियमांचे पालन करत नाही. मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे, त्यामुळे मुंबईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे विधान पालक मंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. त्यामुळे मुंबईत कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने पालक मंत्री अस्लम शेख यांनी दादर मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्राहकांना आणि दुकानदारांना गर्दी न करण्याचे आणि होम डिलिव्हरीची सुविधा सुरू करण्याचे आवाहन केले. मुंबईसह राज्यात कोरोना वाढत असल्याने कारण नसताना घराबाहेर पडू नका, कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावा, असे आवाहनही त्यांनी केले.मुंबईत लॉकडाऊन लागू करावा, अशी आमची इच्छा नाही. परंतु, मार्केटमधील गर्दी अशीच राहिली तर निर्णय घ्यावा लागेल. मुंबईत कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असे अस्लम शेख यांनी सांगितले. रोज दहा दहा हजार रुग्ण सापडणे हे चांगले लक्षण नाही आणि ते परवडणारंही नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळलेच पाहिजे. स्वत:च्या आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी घेतलीच पाहिजे, असे सांगतानाच आता कुठे लोकांची गाडी पटरीवर आली आहे. आता कुठे व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोकांना अधिक त्रास होऊ नये ही आमची इच्छा आहे. पण लोकांनीही त्याचे भान राखले पाहिजे, असेही ते म्हणाले.मुंबईत बेड्स आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. कशाचीही कमतरता नाही. पण परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधांचीही कमतरता पडू शकते, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.अस्लम शेख यांनी मुंबईबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागू करणार की कठोर निर्बंध लागणार? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शेख यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईत संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मात्र, काहीही असले तरी मुंबईत कडक निर्बंध लागणार असल्याची मात्र दाट शक्यता वर्तवली जात आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget