‘निर्लज्ज सत्तेला विचारा किती मंत्र्यांचे मुलं सैन्यात’ - कन्हैय्या कुमार

नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सलाम करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “एकीकडे शेतकरी बापाची मुलेच सैनिक आहेत, तर दुसरीकडे देशात बाप गृहमंत्री आणि मुलगा बीसीसीआयचा सचिव आहे. किती मंत्र्यांची मुले सैन्यात आहे हा प्रश्न सत्तेला विचारा,” असे मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केले. या ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या ट्विटला लाईक करत रिट्विट करत आहेत, तर भाजप समर्थकांकडून यावर टीकाही होत आहे. 

कन्हैय्या कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “एकिकडे बाप गृहमंत्री-मुलगा बीसीसीआय सेक्रेटरी, तर दुसरीकडे बाप शेतकरी-मुलगा सैनिक आहे. त्यामुळे किती मंत्र्यांची मुले सैन्यात भरती झालेत हे निर्लज्ज सत्तेला विचारा. भेकड नक्षलवादी हल्ल्यात सर्वसामान्य लोकांचेच रक्त वाहते आणि याचा फायदा खुर्चीजीवी घेतात. देशाने हे षडयंत्र समजून घ्यायला हवे. पराक्रमी जवानांना आणि शेतकऱ्यांना सलाम.”

कन्हैय्या कुमार यांचं हे ट्विट तब्बल ३० हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले, तर ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. यातील जवळपास १ हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट करताना त्यावर प्रतिक्रिया देखील दिली. याशिवाय ट्विटवरही ५ हजारपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या. यात काहींनी कन्हैय्या कुमार यांच्या मताशी सहमती दाखवली, तर काहींनी यावर तीव्र आक्षेप घेत कन्हैय्या कुमार यांच्यावर टीका केली. टीका करणाऱ्यांमध्ये नामवंत लोकांचाही समावेश आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget