ठाणे महापालिकेत ६२४ कोटी मालमत्ता कर जमा

ठाणे - ठाणे महापालिकेस २०२०-२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६२४.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी झालेल्या ५०२ कोटींच्या करवसुलीच्या तुलनेत ही रक्कम १२२.७८ कोटींनी जास्त आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसल्याने सुरुवातीच्या महिन्यात अत्यल्प करभरणा झाला होता. परंतु शेवटच्या मार्च महिन्यात प्रशासनाने कठोर मोहीम हाती घेऊन १०७.६३ कोटींची विक्रमी वसुली केली. घोडबंदर परिसरातील माजीवडा-मानपाडा प्रभागातून सर्वाधिक १८६ कोटींची सर्वाधिक वसुली झाल्याने महापालिकेस मोठा आर्थिक दिलासा मिळाला.

ठाणे महापालिकेच्या कर विभागास मालमत्ता कराच्या माध्यमातून ६८२ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु एप्रिलमध्ये सुरू झालेला लॉकडाउन जूनपर्यंत वाढल्याने करवसुली अडचणीत आली होती. जुलैपासून महापालिकेकडून करवसुलीचा वेग वाढवून अवघ्या २४५ दिवसांच्या कालावधीत करवसुली मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यातील सेवाकराच्या सवलतीच्या मोहिमेला प्रतिसाद देत एक लाख ८० हजार २५८ करदात्यांनी २४१.५२ कोटींचा करभरणा झाला होता. तर दुसऱ्या टप्प्यात थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देण्यात आल्याने एक लाख १३ हजार ५२८ करदात्यांना १३ कोटी ८६ लाखांच्या रकमेची सूट मिळू शकली. यंदाच्या वर्षभरात दोन हजार ४८७ नव्या मालमत्तांना करआकारणी करण्यात आली. तर करभरणा न केलेल्या चार हजार ३१२ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.करोना प्रादुर्भावामुळे अडचणीत असलेल्या ठाणे महापालिकेस मालमत्ता कराच्या उत्पन्नातून ठाणेकरांनी सहकार्य केल्याची भावना महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे, तर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबद्दल ठाणेकरांचे आभार मानले.घोडबंदर परिसरातील मोठ्या गृहसंकुलांचा समावेश असलेल्या माजीवडा-मानपाडा प्रभागातून १८६ कोटींची विक्रमी वसुली झाली आहे. तर वर्तकनगर ९२.०५, नौपाडा-कोपरी ८३.६५, उथळसर ४५.१३, मुंब्रा ३३.५९, दिवा ३१.३७, वागळे १७.०३, कळवा २६.६१ तर लोकमान्य-सावरकर प्रभागातून सर्वांत कमी २६.३८ कोटींचा करभरणा झाला. मुख्यालयाकडे ५१.३६ कोटींचा करभरणा झाला आहे. कर सवलतचे १७.५३ आणि इतर वसुली ४.०८ कोटी असा ६२४.७८ कोटींचा कर महापालिकेकडे जमा झाला आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget